युक्रेनमध्ये स्थिति चिंताजनक ; भारतीयांना रेल्वेत चढण्याची परवानगी मिळेना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
किव :- युद्धग्रस्त युक्रेनमध्ये स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. येथील खारकिव्ह शहरात मंगळवारी (ता,एक) सकाळी गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. या दरम्यान युक्रेनमध्ये भारतीय दूतावासातर्फे सर्व भारतीय नागरिकांना शहर सोडण्याचे आदेश दिल्यानंतर काही तासानंतर वोकझल रेल्वेस्थानकावर अडकलेल्या एक भारतीय विद्यार्थिनीने मंगळवारी एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओत ती म्हणते, की भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी नागरिकांना रेल्वेत चढण्याची परवानगी देण्यात येत नाही. विद्यार्थिनी अंश पंडिता व्हिडिओत म्हणते, भारतीय दूतावासाच्या सल्ल्यानंतर भारतीय विद्यार्थी रेल्वेस्थानकावर पोहोचले, जिथे स्थानकावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भारतीय व दुसऱ्या देशांतील नागरिकांना थांबवले.
मी आपल्या दाखवू शकते की येथे किती गर्दी आहे आणि येथे धक्काबुक्की होत आहे. विद्यार्थिनी म्हणते, आम्ही येथे तिरंगा ही लावला आहे. येथे सर्वजण घाबरले आहेत. आम्हाला आशा आहे, की भारतीय दुतावास आम्हाला बाहेर काढेल. आम्हाला लवकरात-लवकर घरी परतायचे आहे. आम्ही भारतीय दुतावासाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला बाहेर काढावे. युक्रेनमधील (Ukraine) भारतीय दुतावासाने मंगळवारी विद्यार्थ्यांसहित सर्व भारतीयांना उपलब्ध रेल्वे किंवा इतर साधनांनी आज तात्काळ किव्ह सोडण्याचा सल्ला दिला असताना असे प्रकार घडत आहेत.
युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर युद्धग्रस्त देशाच्या हवाई क्षेत्र बंद झाल्याने भारत येथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना रोमानिया, हंगेरी, पोलंड आणि स्लोव्हाकियाशी लागून असलेली तिची (युक्रेनची) सीमा चौकीच्या माध्यमातून बाहेर काढत आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….