संपामुळे एसटीला दोन हजार कोटीचा तोटा ; एसटी प्रशासानाची माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इतर वेळी एसटीचे दैनंदिन उत्पन्न २२ कोटींचे होते.
मात्र, त्यानंतर कोरोना (corona) आणि आता संपामुळे एसटीचे चाक अधिकच खोलवर रुतले असल्याने १७ फेब्रुवारीपर्यंत १६०० कोटींचे नुकसान झाले होते. आता तब्बल दोन हजार कोटींच्या घरात तोटा गेला असल्याचे एसटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची राज्यभरातील सेवा ठप्प झाली आहे. राज्य सरकारने खासगी प्रवासी वाहतूकदारांना सध्या राज्य प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. मात्र, त्यांनी मनमानी भाडे वसूल करत प्रवाशांची लूट चालवली आहे. बस चालवण्यासाठीही एसटी प्रशासनाकडे कर्मचारी नाहीत. सध्या काही प्रमाणात एसटीची सेवा सुरू आहे; परंतु उत्पन्नात फार भर पडलेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
एकूण ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी मोजकेच कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….