दोन दिवसात 2 एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या ; अखेर संपावर तोडगा कधी….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 27 फेब्रुवारी :- एसटी अर्थातच राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप पुकारला.
या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडूनही अनेक प्रयत्न झाले. त्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू सुद्धा झाले मात्र, अद्यापही अनेक कर्मचारी हे संपावर ठाम आहेत. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर तोडगा निघत नाहीये आणि परिणामी कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचाही आता सामना करावा लागत आहे. त्यातच एसटी कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत.
दोन दिवसांत दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या गेल्या दोन दिवसांत एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. दोन दिवसांत दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. उस्मानाबाद येथील वाहक हनुमंत अकोसकर आणि पिंपरी चिंचवड येथील चालक संजय सरोदे यांनी आत्महत्या केली आहे.
उस्मानाबाद येथील एसटीचे वाहक हनुमंत चंद्रकांत अकोसकर यांनी शुक्रवारी (25 फेब्रुवारी) रात्री विषारी औषध प्राशन करून राहत्या घरी आत्महत्या केली.
शुक्रवारीच एसटी महामंडळचं राज्य शासनात विलगीकरण होणार की नाही याबाबतची कोर्टात सुनावणी झाली पण न्यायालयाने पुन्हा नवी तारीख दिल्याने अकोसकर हे हताश झाले होते. त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असं बोललं जात आहे. हनुमंत चंद्रकांत अकोसकर यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी आणि आई वडील आहेत. त्यांच्या या निर्णयाने घरावर व एसटी कर्मचारी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उस्मानाबाद येथील वाहक हनुमंत अकोसकर यांच्या मृत्यू नंतर एसटी कर्मचारी संतप्त झाले आणि त्यांचा मृतदेह उस्मानाबाद येथील बस आगरात उपोषणस्थळी आणल्याने तणावाचे व भावुक वातावरण निर्माण झाले होते. सरकार व प्रशासन चा भावनाशून्य ? कारभार पाहायला मिळत असून जाग कधी येणार हा प्रश्न विचारला जात आहे. तर काल (26 फेब्रुवारी 2022) पिंपरी चिंचवड येथील आगारात कार्यरत असलेले एसटी चालक संजय सरोदे यांनी टोकाचं पाऊल उचललं. संजय सरोदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मात्र, संजय सरोदे यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. एसटी संपामुळेच नैराश्येत त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..