वीज वितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचा चक्काजाम ; गुंज येथे तब्बल दोन तास पुसद माहूर महागाव रोडवरील वाहतूक ठप्प….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
महागाव तालुक्यातील गुंज येथे वीज वितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले पुसद माहूर महागाव रोडवरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले सवना धनोडा काळी फिटर वरील सिंगल फेज रोहित्र मागील काही महिन्यांपासून बंद करण्यात आला असून त्यामुळे शेतामध्ये जागली साठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधाराचा सामना करावा लागतो आहे सध्या गुंज परिसरात बिबट्या आल्याची चर्चा असून तो मागील काही दिवसापासून परिसरात फिरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे मागील काही वर्षापासून सुरू असलेला सिंगल फेज अचानक बंद करण्यात आला असून या विषयावर वीज वितरण विभागाची शेतकऱ्यांनी वारंवार कधी प्रत्यक्ष तर कधी फोनवर संपर्क केला विनंती अर्जही सादर केले परंतु अद्यापही सिंगल फेज रोहित्र सुरू करण्यात आलेला नाही त्यामुळे गुंज सवना धनोडा फिटर वरील शेतकऱ्यांनी गुंज बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन केले त्यामुळे पुसद महागाव माहूर रोड वरील तीन तास वाहतूक ठप्प झाली होती

आंदोलनाची धास्ती घेऊन वीज वितरण कंपनीने एक दिवस अगोदर सवना फीटर सुरू केले परंतु उर्वरित धानोडा व काळी फिटर अद्यापही बंद आहे त्यासाठी हे फिटर लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे वीज वितरण कंपनी महागावचे उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यांच्याकडून लेखी आश्वासन घेऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव अरुण पाटील पंचायत समिती सदस्य गजानन कांबळे गणेश तोडक राजेश सोळंके गजानन काळे संतोष मते गजानन तळणकर समशेर भाई तानाजी जाधव विश्वनाथ कलाने प्रल्हाद जोरोळे उत्तमराव चिंचोळकर नाना गोरे हरिभाऊ पुंड प्रवीण गोरे पोलीस पाटील ज्ञानेश्वर भोने अमर अंभोरे समाधान बोबडे माधवराव कानडे गजानन मते विठ्ठल गायकवाड गुलाब मते कैलास झाडे व इतर असंख्ये शेतकरी उपस्थित होते

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….