समीर वानखेड़ेच्या अडचणीत वाढ ; कोपरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ठाणे, 20 फेब्रुवारी :- एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.
शनिवारी रात्री कोपरी पोलीस ठाण्यात वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर लावण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द केला होता. समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नवी मुंबई वाशी येथून गुन्हा वर्ग केल्या नंतर कोपरी पोलिस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गोगावले यांनी शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. गोगावले यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, समीर वानखेडे यांनी खोटी माहिती दिली आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्य विक्रीचा परवाना मिळवला. समीर वानखेडे यांच्या नावावर नवी मुंबईतल्या वाशी येथे एक बार आहे.
उत्पादन शुल्क विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या बारसाठी 27 ऑक्टोबर 1997 रोजी परवाना दिला होता. या बारचे लायसन 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. यावरुनच नवाब मलिकांनी वानखेडेंवर निशाणा साधला होता. हे बार आणि रेस्टॉरंट आहे.
वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बाजवल्यानंतर कारवाई केली होती. वाशी येथील सतगुरु हॉटेल्स च्या लायसन्स मध्ये वयाचा पुरावा नसल्याने समीर वानखडे काही त्रुटी आढळल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या ठिकाणी परदेशी बनावटीची तसेच IMFL (भारतीय बनावटीची विदेशी मद्य) विक्री करण्याची परवानगी दिली आहे. मात्र एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देताना समीर वानखेडेंनी म्हटलं होतं की, हॉटेलचा परवाना आपल्या नावे असला तरी 2006 मध्ये भारतीय महसूल सेवेत दाखल होताच पॉवर ऑफ अॅटर्नी वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे केला आहे.
दरम्यान या प्रकरणी काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाकडून समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू होती. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून बारचा परवाना रद्द करण्यात आला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….