दिव्यांग व्यक्तींनी महाशरद पोर्टलवर नोंदणी करावी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 17 फेब्रुवारी :- दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थ्यांसाठी शासनाने महाशरद पोर्टल सुरू केले आहे. दिव्यांग व्यक्ती या पोर्टलद्वारे शासनाच्या मंचावर सहाय्य उपलब्ध होण्यासाठी नोंदणी करून आवश्यक मदत व सहकार्य मिळवू शकतात. सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती, सामाजिक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामुल्य जोडणारा दुवा आहे. पोर्टलवर दिव्यांगाना व्यासपीठ मिळवून दिले जात आहे. सर्व प्रकारचे दिव्यांग या पोर्टलवर आपले नाव नोंदवू शकतात.
दिव्यांग व्यक्ती आणी त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या वर्गणीदारांना एकत्र आणून वर्गणीदारांचे सहकार्य पोर्टलद्वारे मिळविण्यात येत आहे. पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांगांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देणे, विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगांची परिस्थिती आणि गरजा समजून घेणे. याद्वारे दिव्यांग व्यक्ती, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार यांना एका छताखाली आणण्यात येत आहे. तरी www.mahashard.in या संकेतस्थळावर दिव्यांग व्यक्ती, सामाजिक संस्था, देणगीदार, कंपन्या यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….