विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
खंडाळा :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा महामार्गावर अपघात झाला.
यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आमदार प्रवीण दरेकर हे पुण्याहून महाबळेश्वरला निघाले होते. दरम्यान खंडाळाजवळील जुना टोलनाका ओलांडल्यानंतर सेवा रस्त्यावरून येणारी दुचाकी अचानक महामार्गावर समोर आली. यावेळी पोलीस वाहनाने अचानक ब्रेक लावला. यात पोलीस वाहनाची दुचाकीला धडक झाली.
सुदैवाने यात कोणतीही मोठी दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही. वाहनांचा ताफा अचानक थांबल्याने आमदार दरेकर यांनी खाली उतरून दुचाकीस्वाराची चौकशी केली, तसेच वाहनाच्या नुकसानीची पाहणी केली. किरकोळ अपघात असल्याने त्यांचा ताफा लगेच महाबळेश्वरकडे रवाना झाला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..