मुख्यमंत्री ठाकरे कडून के. चंद्रशेखर राव यांना भोजनाचे निमंत्रण ; राजकीय हालचालींना वेग..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव रविवारी मुंबईत येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले आहे.
तसेच या भेटीत समविचारी पक्षांना संघटित करतानाच पुढील दिशा निश्चित करण्यासाठी यांच्यात चर्चा होणार आहे. याबाबत तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. त्याचदिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिल्ली वारी केली. तर लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करत भेटीला येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे राजकारणात मोठ्या हालचाली घडताना सध्या दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी राव यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पुराव्याची मागणी केली होती. दरम्यान बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच नवी दिल्लीत बैठक होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनीही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे स्टॅलिन, तेलंगणचे चंद्रशेखर राव या प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट होण्याची चित्रे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील तसेच देशातील राजकारणाला चांगलाच वेग आल्याचे दिसते आहे.

सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप..! पुलाखाली सापडली स्फोटके ; मोठा अनर्थ टळला….