पगडी घातल्यानं कुणी सरदार होत नाही :- प्रियंका गांधींचा टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमृतसर :- पगडी घालून कोणी सरदार होऊ शकत नाही. पंजाबमध्ये पंजाबी लोकच राज्य करतील. कोणतेही नवीन मॉडेल या ठिकाणी चालणार नाही. ना मोदींचे ना केजरीवालांचे. मॉडेल फक्त कॉंग्रेसचे आणि पंजाबी लोकांचेच चालेल, असे कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या.
प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आज कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रुपनगर येथे रोड शो केला. त्यांनी ट्रॅक्टरवर बसून रोड शो केला. यावेळी त्यांच्यासमवेत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी होते. त्यानंतर त्या अमृतसरला रवाना झाल्या. तेथे त्या पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रचार करत आहेत. तसेच अमृतसर पश्चिम भागात बटाला रोड भागात देखील जाणार असून तेथे रोड शो आणि डोअर टू डोअर प्रचार करणार आहेत. यादरम्यान त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पगडी घातल्याने कोणी सरदार होऊ शकत नाही. आपल्यासमोर भाजप (BJP) आणि आम आदमी (AAP) पक्षाचे नेते आहेत. दोघेही एकच खेळ खेळतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांना पाहा. त्या दोघांची सुरवात कोठून सुरवात झाली. या दोघांची सुरवात संघापासूनच झाली आहे. यापैकी एक जण गुजरात मॉडेलची गोष्ट मांडतात, तर दुसरे दिल्ली मॉडेलची.
परंतु आपण गुजरात मॉडेल पाहिले. कोणालाही नोकरी मिळाली नाही आणि व्यवसायही चालला नाही. कोणालाही मदतीचा हात मिळाला नाही. दिल्ली मॉडेलनुसार राज्यात नवीन रुग्णालय आणि शिक्षण संस्था देखील उभारली गेली नाही. भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या, की व्यासपीठावर पगडी घातल्याने कोणी सरदार होऊ शक नाही. तुम्हीच सांगा खरा सरदार कोण आहे. या पगडीमागची मेहनत आणि धाडस सांगा. पंजाब पंजाबी लोकांचे असून ते त्यांना सांगा, असे आवाहन प्रियांका गांधींनी केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी प्रियांका गांधी या प्रचारासाठी पंजाबमध्ये आल्या होत्या. त्यांनी कोटकपूरा, धुरी, डेराबस्सी येथे सभा घेतली आणि रोड शो घेऊन जनतेशी संवाद साधला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..