राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पडला मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या विसर ; इंदापूर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नावाचे उल्लेख केले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारामती :- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडला.
इंदापूर येथील कार्यक्रमात व मुख्यमंत्री म्हणून भरणे यांनी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार असा उल्लेख केला. यानंतर व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची चूक सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत असे सांगितले. तर उपस्थितांनी पहाटेचा शपथविधी अजूनही लक्षात आहे का? असा शेरा मारला.
इंदापूर येथील एका खाजगी कार्यक्रमांमध्ये सोमवारी ( दि. 15) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. राज्यमंत्री भरणे म्हणाले, महा विकास आघाडीचे जे घटक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील या वाक्यावर व्यासपीठावर उपस्थित मंडळींनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत अशी आठवण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना करून दिली. यावर भरणे यांनी होय का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत असे विचारले. तसेच उपस्थितांनी पहाटेचा शपथ विधी अजूनही लक्षात आहे का असा मिश्किल शेरा देखील मारला.
या नंतर सारवासारव करत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सतत डोक्यात खूप विचार असल्यामुळे असे होते. त्याला काय करता असे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले. या कार्यक्रमानंतर भरणे यांचा हा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..