नागरिकांनी स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तू नगरपालीकेला दान कराव्या :- पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे आवाहन ; स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तूचे नगरपालीका जतन करणार इंग्रजकालीन प्रिंटींग मशीन राऊत दाम्प्त्याने नगरपालीकेला केली दान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 14 फेब्रुवारी :- यवतमाळ नगरपालीकेतर्फे ‘स्वातंत्र स्मृती दालन’ उभारण्यात येत असून या दालनात स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तुचे म्युझीयम उभारण्यात येत आहे. यातुन पुढील पिढीला स्वातंत्र्य संग्रामात यवतमाळ जिल्ह्याचे योगदान माहिती होऊन त्यापासून त्यांना प्रेरणा मिळेल. तरी इच्छुक नागरिकांनी त्यांचेकडील ऐतिहासिक वस्तु नगरपालीकेला दानस्वरूपात भेट द्याव्या, असे आवाहन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले आहे.

स्वांतत्र्यापुर्वीची इंग्रजकालीन प्रिंटींग मशीन आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार श्रीकांत राऊत व अलका राऊत या दाम्पत्याने नगरपालीकेला दानस्वरूपात विश्रामगृह येथे भेट दिली. यावेळी पालकमंत्री यांनी राऊत दांपत्याचा शाल श्रीफळ व दानपत्र देवुन सत्कार केला, या वेळी नगर पालीकेच्या प्रशासक माधुरी मडावी, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापुरे, डॉ. विजय अग्रवाल, दिलीप जैन, बाळू देशकर आदि उपस्थित होते.
ही प्रिंटींग मशीन मॉडेल 1885 चे असून ते पोर्टेबल आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात जहालगटाचे यवतमाळ प्रमुख, लोकमान्य टिळकांचे अनुयायी तथा यवतमाळ वृत्तपत्रसृष्टीचे आद्य पत्रकार साप्ताहिक हरिकिशोर चे संपादक पृथ्वीगिर हरिगिर गोस्वामी यांचेकडे ही मशीन होती. इंग्रजांच्या विरोधात त्या काळी या मशीनवर बुलेटिन छापून गावात वाटले जात होते. इंग्रजांनी ही पोर्टेबल प्रिंटिंग मशीन अनेकदा जप्त केल्याची नोंद संदर्भ ग्रंथात आहे, विदर्भ आणि महाराष्ट्रात सध्या ही मशीन एकमेव वस्तू आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा ही मशीन स्वातंत्र्य संग्राम सैनिक दादा राऊत यांचे कडे होती, अशी माहिती दादा राऊत यांचे नातू श्रीकांत राऊत यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली.
स्वातंत्या,धच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यवतमाळ नगरपालीकेतर्फे नगरभवन येथे ‘स्वातंत्र स्मृती दालन’ (वस्तू संहालय) उभारण्याचा प्रशासक म्हणून ठराव घेण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सांगितले.
याअंतर्गत स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तुंचे जतन करण्यात येणार आहे. नगरभवनलगतचे ऐतिहासिक पाश्वभूमी असलेले 34 कलम मैदान (आजाद मैदान) नगरपालीकेला हस्तांतरीत करण्याबाबत जिल्हाधिकारी महोदयांकडे मागणी केली आहे. हे मैदान ऐतिहासिक दृष्ट्या जतन करण्यात येईल तसेच या मैदानातील हुतात्म्यांचे प्रतिक जयस्तंभाचे नुतनीकरण देखील नगरपालीका करेल, अशी संकल्पना नगरपालीकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी यावेळी व्यक्त केली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….