अमरावती पोलीस स्टेशन मध्ये खासदार नवनीत राणांचा हायहोल्टेज ड्रामा ; पोलिसांवर केले गंभीर आरोप…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती, 12 फेब्रुवारी :- अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा वाद चिघळला आहे. मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केल्यानंतर 5 जणांना पोलिसांनी अटक केली.
अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी, ‘पोलिसांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली, याबद्दल मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार, असा पवित्राच नवनीत राणा यांनी घेतला आहे. अमरावती पालिकेची परवानगी न घेतला आमदार रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यावरून अजूनही वाद पेटलेले आहे.
यात राजापेठ पोलीस ठाण्यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या असता त्यांना युवा स्वाभिमान च्या कार्यकर्त्यांसोबत भेटण्यास पोलिसांनी मनाई केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. ‘पोलिसांनी निर्दोष लोकांना अटक केली, गुन्हेगाराप्रमाणे पोलीस मारहाण करत आहे व रवी राणा यांचं नाव सांगा असा दबाव पोलीस आणत आहे’ असा आरोप नवनीत राणा यांनी केला, तर मारहाणीची तक्रार मी मानवधिकार आयोग व न्यायालयात करणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले
दरम्यान, राजापेठ उड्डाणपुलावरील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर युवा स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली.
या शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न सारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. दिल्लीवरून नवनीत राणा परत आल्यानंतर आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला व या अटक असलेल्या कार्यकर्त्यांना राजापेठ पोलीस ठाण्यात गेल्या असता त्यांना पोलिसांनी कार्यकर्त्यांची भेट नाकारली. याच पोलीस ठाण्यात हजर असलेल्या पोलीस उपायुक्त साळी यांची भेट घेण्यासाठी नवनीत राणा जात असताना त्यांच्या सचिवांना आत मध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने या ठिकाणी खासदार राणा व राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्यात बाचाबाची झाली. ‘मी आत जाणार नसून पोलीस उपायुक्त यांनाच बाहेर बोलवा’ अशी भूमिका नवनीत राणा यांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर नवनीत राणा यांना पोलीस ठाण्यात सचिवांना घेऊन जाण्याची परवानगी दिली. ‘पोलीस कोठडीमध्ये API राऊत हे रात्री बेरात्री कार्यकर्त्यांना जबर मारहाण करतात तसंच आजारी असलेल्या कार्यकर्त्याला औषधी व जेवण देत नसल्याची तक्रार राणा यांनी पोलीस ठाण्यात तसंच पोलीस आयुक्तांकडे केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….