वाहनचालकांना दिलासा ; “ड्रायव्हिंग करतांना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर :- नितिन गडकरी”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भारतीय वाहन चालकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. अलीकडेच वाहतुकीच्या नियमात बदल करण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे चालकांना दंडाची शिक्षा करावी लागते.
विशेष म्हणजे दंडाच्या रकमेत वाढही करण्यात आलीय. गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणं कायद्याने गुन्हा आहे. मात्र या नियमाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. ”गाडी चालवताना फोनवर बोलणं आता गुन्हा ठरणार नाही, परंतु त्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लवकरच याविषयीची घोषणा लोकसभेत केली जाईल,” असं देखील नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे.
”गाडी चालवताना तुम्ही फोनवर बोलू शकता, परंतु बोलत असताना फोन तुमच्या हातात नसावा. हॅण्ड्सफ्री उपकरण वापरून तुम्ही फोनवर बोलू शकता. फोनवर बोलताना तुमचा मोबाईल तुमच्या खिशात असावा अथवा बाजूला ठेवलेला असावा. या पद्धतीने तुम्ही फोनवर बोललात तर तो गुन्हा ठरणार नाही,” असं गडकरी म्हणाले.
दरम्यान, ”या परिस्थितीमध्ये वाहतूक पोलीस (Traffic Police) तुमच्याकडून दंड आकारू शकत नाहीत. पण. पोलिसांनी अशी कारवाई केल्यास तुम्ही त्यांच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकता. गाडी चालवताना फोनवर बोलत आहात, म्हणून अटक झाली तरीही तुम्ही न्यायालयात अपील करू शकता. यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. हा निर्णय रस्ते अपघात कमी करण्याच्या सरकारच्या ध्येयाशी सुसंगत असल्याचे गडकरी म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….