ज्येष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज यांचे निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ज्येष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज यांचं शनिवारी निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे.
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण घेतले आहे. राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.
बजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटा :-
राहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….