हिजाब वादावर ओवेसींनी पाकिस्तानला फटकारले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- हिजाब वादावर देशात वातावरण चांगलेच पेटले आहे. देश विदेशातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. नोबल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजाई हिने भारतीय नेते मंडळींना ह्या प्रकरणात लक्ष घालून मुस्लिम मुलींच्या हिजाबचा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले होते.
आता शेजारील राष्ट्र पाकिस्तानने ह्या प्रकरणात आपले डोके खुपसून भारताला हिजाब वादावर सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर ऑल इंडिया मजलीस-ए-मुसलमिन चे अध्यक्ष असादुद्दीन ओविसी यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले.
असादुद्दीन ओविसी यांनी पाकिस्तानला, तुम्ही तुमच्या देशाचे बघा, आमच्या भांडणात पाय, नाक घुसवू नका, तुम्ही जखमी व्हाल. तुमच्या देशातील बलुचिस्थान आणि इतर प्रश्न सोडवा. आम्ही आमच्या देशातील प्रश्न सोडवायला समर्थ आहोत. तुमची सल्ले आम्हाला नको असे स्पष्ट शब्दात सुनावले.
उडीपि येथील एका शाळेत हिजाब घालून आलेल्या मुलींना शाळेने प्रवेश नाकारला होता. त्यानंतर कर्नाटकातील अनेक शाळांनी त्यांच्या धडा गिरवत हिजाब बंदी केली होती. त्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. या वादात हिंदू संघटनांनी उडी घेत मुलांना भगवी शाल (शेले) घालण्याचे आवाहन केले आणि हा मुद्दा अधिक चिघळला. प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेले असून त्यावर १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने पूढील सुनावणीपर्यंत विद्यार्थ्यांना कोणताही धार्मिक पोशाख न करता शाळा, महाविद्यालयात परत यावे असे आवाहन केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….