एसटी विलिनीकरणावर अहवाल सादर करण्यासाठी सरकारने मागितला आणखी एक आठवड्याचा वेळ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटीचा संप अजूनही सुरु आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं, अशी मागणी कामगारांनी लावून धरली असून जवळपास तीन महिने हा संप सुरु आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करायचं की नाही, यासंदर्भात समितीचा अहवाल 12 आठवड्यांनी सुपूर्द करणे अपेक्षित होते.
मात्र, त्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याची चिन्हे आहेत.
मुदत संपल्याच्या तारखेला आणखी दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करु, असं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं. राज्याची परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली होती. मात्र, आता ती मुदतही उलटून गेली असून आता तो अहवाल सादर करायला राज्य सरकारने आणखी एका आठवड्याचा वेळ मागितला आहे.
हायकोर्टाच्या आदेशानुसार, राज्य शासनाने अहवाल तयार करण्यासाठी ही त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. आणि या समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार विलीनीकरणाबाबत निर्णय घेईल, असं आश्वासन मंत्री अनिल परब यांनी वारंवार दिलं आहे. मात्र, आता ST विलिनीकरणावर अहवाल सादर करायला राज्य सरकारने एका आठवड्याचा वेळ मागितला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….