छातीत दुखत असल्याचे सांगणारे नितेश राणे पंतप्रधानाच्या सभेला गोव्यात पोहोचले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गोवा, 10 फेब्रुवारी :- शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे छातीत दुखत असल्यामुळे जेलमध्ये न जाता हॉस्पिटलमध्ये होते.
पण, अचानक नितेश राणे गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला हजर झाले. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना जामीन मिळाला आहे. पण छातीत दुखत असल्याचे कारण देऊन नितेश राणे जेलमध्ये गेले नाही.
तब्येत बरी नाहीये आणि छातीत दुखतंय म्हणुन जेलमध्ये न जाता जिल्हा रुग्णालयात मुक्काम केला होता. पण अचानक नितेश राणे हे गोव्यात दिसले. गोवा राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन केले गेले होते. त्या सभेला आमदार नितेश राणे उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
एकाएकी नितेश राणे यांची तब्येत कशी बरी झाली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय? पत्रकारांनी नितेश राणे यांचे चित्रिकरण करण्यास सुरुवात केली आणि त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करताच “मी सभा सोडून जाऊ का?” असा रागव्यक्त केला आणि त्यांनी बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, सूत्रांच्या माहितीनुसार, नितेश राणे गोव्याच्या दिशेने संध्याकाळीच रवाना झाले होते. नितेश राणे पडवे येथील sspm रुग्णालयात पोहोचल्यानंतर काहीच वेळात देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला.
‘पंतप्रधान मोदींची गोव्यातील सभा संपल्यावर भेटूया’ असे बोलल्याचे समजते. त्यानंतर नितेश राणे तात्काळ गोव्याच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. मात्र निघताना कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. विशेष म्हणजे, आजारापणावरून नितेश राणे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता खुद्द नितेश राणे गोव्यात हजर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
मी पेनकिलर खाऊन सभेला आलो :- नितेश राणे…
दरम्यान, ‘आपली तब्येत बरी नाही, तरीही आपण फक्त आपल्या नेत्या करता पंतप्रधान मोदी यांच्या सभेला पेनकिलर गोळ्या खाऊन आलोय, असं स्पष्टीकरण नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….