मोदींनी महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर ठरवल्याने संजय राऊत भड़कले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात महाराष्ट्राला कोविड स्प्रेडर म्हणून संबोधले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.
तसेच मोदींच्या या आरोपावर आता मनोविकास आघाडीकडूनही नाराजी तरी व्यक्त केले जात आहे.
या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले,’कोणाला गुडघे टेकायचे असतील, कोणाला महाराष्ट्राची लाज बाहेर काढायची असेल तर काढावी. काल त्यांनी तेच केलं ना.महाराष्ट्र करोनाचा सुपर स्प्रेडर? महाराष्ट्राने जगात सर्वोत्तम काम केलं. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रांमध्ये बेवारसपणे प्रेतं नाही फेकली. किती खोटं बोल आहात आपण. महाराष्ट्रातील भाजपाच्या एका तरी नेत्याने यावर निषेध सोडा पण साधी नाराजी तरी व्यक्त करावी. हे तुमचं महाराष्ट्रप्रेम आणि हा तुमचा महाराष्ट्र बाणा’ अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ते पुढे म्हणाले,’कोरोनाच्या काळात मोदी सरकारने ज्यांना वाऱ्यावर सोडलं त्यांना मदतीचा हात देणं आम्ही आमचं कर्तव्य समजलं. सुटाबुटाच्या मोदी सरकारमध्ये गिनतीत नसलेल्या गोरगरीब जनतेला मदत करणे हा गुन्हा असेल तर आमचा पक्ष असे गुन्हे करत आलाय, करतोय आणि पुढेही करत राहील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..