राज्यात १० मार्चनंतर भाजप सरकार ; चंद्रकांत पाटलांकडून नवीन तारीख….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेलं पत्र आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार असल्याचं सांगत पाटील यांनी नवीन तारिख दिली आहे. याआधी भाजपने सरकार कोसळणार अशा अनेक तारखा दिलेल्या आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देशातील संस्थांच्या मदतीने नेत्यांवर आणि मंत्र्यांवर दाबव आणला जात आहे. आपल्यावर देखील सरकार पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
हाच धागा पकडून चंद्रकांत पाटील यांनी राज्यात 10 मार्चनंतर राज्यात भाजप सरकार राहिलं. याबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी आपण तसं बोललो असं पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. सत्तेचा दुरुपयोग सुरू असून या परिस्थितीत कार्यकर्त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी १० मार्चनंतर राज्यात भाजपचं सरकार येईल, असं म्हणाल्याचं पाटील यांनी नमूद केलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..