“या” राज्यात भाजपाला मोठा धक्का ; दोन आमदारांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- ‘भाजपात सर्वांचाच भ्रमनिरास झालाय. गुजरात, हिमाचल सोबत त्रिपुरामध्येही निवडणूक होण्याची शक्यता आहे.’
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुदीप रॉय बर्मन आणि आशिष साहा यांनी काल त्रिपुरा विधानसभेचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिलीय.
या दोन्ही आमदारांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिलाय. सुदीप रॉय बर्मन आणि आशिषकुमार साहा यांनी नुकताच काँग्रेस प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुदीप रॉय म्हणाले, भाजपमधील अनेक आमदार काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या तयार आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळं त्यांना आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.
भाजप पक्षात सर्वांचाच भ्रमनिरास झालाय. मला वाटतं, गुजरात आणि हिमाचल सोबत त्रिपुरामध्येही निवडणूक होण्याची चिन्हं आहेत, असं ते म्हणाले. दोन्ही आमदारांच्या या राजीनाम्यानंतर 60 सदस्यीय विधानसभेत भाजपचं संख्याबळ 33 वर आलंय. सुदीप रॉय बर्मन पुढे म्हणाले, राज्यात लोकशाही नाही. इथं लोकांचा श्वास गुदमरतोय, अशी टीका त्यांनी केलीय.
यापूर्वी 29 जानेवारीला भाजपचे बंडखोर आमदार सुदीप रॉय बर्मन यांनी त्रिपुरा सरकारवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते, राज्यात लोकशाही नाही. इथं लोकांचा श्वास कोंडला जात आहे. तसेच, पक्ष सोडण्याच्या प्रश्नावर त्यांनी आपल्या जनतेला विचारल्यानंतरच आपलं भविष्य ठरवू, असं सांगितलं होतं. त्रिपुरामध्ये 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सुदीप रॉय हे त्रिपुरा सरकारमध्ये माजी मंत्री राहिले आहेत. पक्षविरोधी कारवायांमुळं त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. काल त्यांनी भाजपवर निशाणा साधत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….