मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला पंतप्रधान मोदींनी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई – देशात करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. लाखो भारतीयांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला. करोना मृत्यूवरून मोठ्या प्रमाणात राजकारणही झालं होतं.
मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात पहिल्या लाटेत करोना संसर्ग वाढीसाठी महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार असल्याचा अजब दावा केला आहे. त्याला आता महाराष्ट्र काँग्रेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे ट्विट
‘पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण करोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. राज्ये अडचणीत आहेत, कोविडच्या तिसरी लाट ओरसत आहे, चीनचा महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे ते भाषण आम्ही ऐकत होतो. पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचे मला स्वतःला वैयक्तिकपणे दुखः वाटले. आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याच्या मला वेदना झाल्या. राज्याने भाजपाला १८ खासदार निवडून दिले आहेत आणि मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे. हे खूप धक्कादायक आहे’