राज्यसभेमध्ये लता दीदींना श्रद्धांजली ; तास भरासाठी कामकाज स्थगित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राज्यसभेमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. राज्यसभेच्या सदस्यांनी (Rajya Sabha) एक मिनीट उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
राज्यसभेचे सभापती एम व्यंकया नायडू (M Venkaiah Naidu) यांनी गायिका आणि सभागृहाच्या माजी सदस्या लता मंगेशकर यांच्या मृत्यूबद्दल शोकप्रस्ताव सादर केला. कामकाज सुरु होण्याआधीच त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच त्यानंतर एका तासासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.

यावेळी बोलताना उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी म्हटलंय की, लता मंगेशकरांच्या जाण्यामुळे देशाचं अतोनात नुकसान झालं असून एक चांगली पार्श्वगायिका देशाने गमावली आहे. त्यांच्या रुपाने भारतीय संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील एक दयाळू व्यक्ती आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे जणू एका युगाचा अस्त झाला आहे. यामुळे संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरुन न निघण्यासारखी आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..