असदुद्दीन ओवेसी म्हणाले “माझ्या मृत्युनंतर मला औरंगाबाद मध्ये दफन करावे” ; वक्तव्यावरून नवा वाद निर्माण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिल्ली :- मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन करा, असे एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी काल लोकसभेद म्हणाले होते. औरंगाबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे.
त्यामुळे असदुद्दीन ओवेसी स्वतःला औरंगजेब समजतात, असे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाले. ओवेसी यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
लखनऊ एक्स्प्रेस वेच्या छिजारसी टोल प्लाझा येथे दोन जणांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार केला होता. झालेल्या हल्ल्यावर ते लोकसभेद बोलत होते. ‘मी मृत्यूला घाबरत नाही. एक ना एक दिवस सर्वांना मरायचेचं आहे. मी या देशात पैदा झालो आहे. जेव्हा माझे डोळे बंद होईल तेव्हा मला औरंगाबादच्या जमिनीत दफन केले जावे, असे ते म्हणाले होते. यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.
औरंबादला औरंगजेबला दफन करण्यात आले आहे. मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन करा, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते. ते स्वतःला औरंगजेब समजतात. खऱ्या अर्थाने त्यांचे खरे दात समोर आले आहे. औरंगजेब आक्रमक होता. या देशाला लुटले, येथील जनतेला लुटले, देवा धर्माचे नुकसान केले, साधू संतांचे नुकसान केले. ओवेसी यांनी स्वतःला औरंगजेबाचे पुरस्कर्ते नव्ह तर त्यांची औलाद असल्याचे स्वतःच्या तोंडून सिद्ध केल्याचे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..