खासदार ओवैसी यांच्यावर युपीमध्ये जिवघेणी हल्ल्याच्या दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी ; पुसद एम.आय.एम पक्षाची मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे सर्वेसर्वा तथा बॅरिस्टर खा. असदुद्दीन ओवैसी साहेब यांच्यावर छिजारसी टोल गेटवर काही समाजकंठक लोकांनी त्यांच्यावर जिवघेणी हल्ला केला,परंतु सुदैवाने ते त्यांच्यातुन वाचले व त्यांच्या वाहनावर चार राऊंड फायर झाले व त्यांचा जिव घेण्याचा प्रयत्न केला . यापूर्वीही दिल्ली येथे त्यांच्या राहत्याघरावर विघातक हल्ला करण्यात आला होता. ज्या व्यक्तीला उत्तम संसदपट्टु म्हणुन पुरस्कारीत केले व एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतांना त्यांच्या सोबत अशा निदंनीय घटना घडणे ही बाब अत्यंत संशयकारक आहे.या सदरील घटनेचा आम्ही ए. आय. एम.आय.एम पक्षा तर्फे तिव्र निषेध नोंदवत असून आमची मागणी आहे की. खा. असदुद्दीन ओवैसी यांना जेड प्लस सिक्योरिटी गृहमंत्रालया कडून त्वरीत देण्यात यावी तसेच या दोषींना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी. आगामी उत्तर प्रदेश राज्यात होणाऱ्या निवडणुका भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडाव्यात कायदा व सुव्यस्था कायम रहावी या उद्देशाने उत्तर प्रदेश राज्यात केंद्रीय सुरक्षा बल पाठविण्यात यावे .अशी मागणी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी मार्फत करण्यात आली

निवेदन देतेवेळी.सैय्यद इम्तियाज निरिक्षक, अमजद खान शहराध्यक्ष, सैय्यद सिद्दीकोद्दीन तालुकाध्यक्ष, डॉ.मो.जुबेर कार्याध्यक्ष तालुका,मिर्झा आदिल बेग प्रवक्ता ,मिर्झा आवेस बेग कार्याध्यक्ष शहर , फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष, डॉ.अन्सार शेख महासचिव, मो.जिब्रान शहर सचिव,सुरज हाडसे, मो.जिया उल हक, सुल्तान खान, सिद्दिक अहेमद, तौफिक मिर्झा, अब्दुल रहेमान चव्हाण, अतिक शेख व अन्य उपस्थित होते.


पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….