योगी आदित्यनाथ यांनी गोरखपुर मधून दाखल केला उमेदवारी अर्ज ; गृहमंत्री अमित शहांनी लावली हजेरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गोरखपुर :- देशात सध्या पाच राज्याच्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याचे दिसत आहे. त्यातही सर्वात जास्त उत्तर प्रदेशच्या निवडणूक या देशात चर्चेच्या असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार योगी आदित्यनाथ आज गोरखपूर (शहर) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. योगी आदित्यनाथ अर्ज भरताना त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याची सगळी प्रक्रिया आधीच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली होती.
पाच वेळा माजी लोकसभेचे खासदार राहिलेले योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदाच राज्य विधानसभेची निवडणूक उमेदवार म्हणून लढवत आहेत. तर, अमित शाह यांनी यापूर्वीच योगी आदित्यनाथ यांना पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलेले आहे.