शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दोन्ही मुली ईडीच्या रडारवर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दोन्ही मुली सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आल्या आहेत. राऊत यांच्या पूर्वाशी आणि विधीता या दोन्ही कन्या मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या वाईन वितरण कंपनीत काही वर्षांपासून भागिदार आहेत.
त्यामुळे त्या ईडीच्या रडारवर आल्या आहेत.
जमीन घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काल ईडीने अटक केली होती. प्रवीण राऊत यांच्या चौकशीत त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांचं नाव समोर आले. यानंतर ईडीने सुजित पाटकर यांच्या घरावर छापा टाकला आहे. सुजित पाटकर हे मॅग्पी डीएफएस प्रा. लि कंपनीमध्ये भागिदार आहेत. संजय राऊत यांच्या पूवार्शी आणि विधीता या दोन्ही कन्या मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या वाईन वितरण कंपनीत काही वर्षांपासून भागिदार आहेत.
सुजित पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने संयुक्तपणे अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ईडीकडून अलीबाग इथल्या जमिन व्यवहाराचीही चौकशी सुरु आहे. मुंबईतील गोरेगाव इथल्या पत्राचाळ जमीन घोटळ्याप्रकरणी ईडीने प्रवीण राऊत यांना काल अटक केली असून त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा हा जमीन घोटाळा असल्याचं सांगितलं जात आहे. प्रवीण राऊत हे ऌऊकछची सहाय्यक कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत संचालक आहेत.दरम्यान, ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांची चिडचिड सुरू झाली आहे. केला आहे.
राजकीय सुडबुद्धीतून ही कारवाई सुरु आहे, आधी लालच दाखवली, मग ऑफर्स दिल्या, त्यानंतर धमकावलं, तरीही झुकले नाही म्हटल्यावर कुटुंबीयांना धमकावलं जात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हमने कहा- छोड़ दो, नजरअंदाज करो इन्हें, जाने दो। तो अब सेंट्रल एजेंसी को हमारे पीछे लगा दिया। चलता है, 2024 तक चलेगा भी..पर हम झुकेंगे नहीं! असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..