अब्दुल कलाम अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 03 फेब्रुवारी :- यवतमाळ शहरात नुकतेच स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी सुरू करण्यात आलेल्या अब्दुल कलाम अभ्यासिकेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज भेट दिली. याप्रसंगी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून व त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके आहेत का, अभ्यासिका किती वेळ सुरू राहते, सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत का याबाबत विचारणा केली. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना वायफाय सुविधा व ‘द हिंदु’ हे वृत्तपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा ग्रंथपाल राजेश कोरे यांना दिल्या. तसेच कुरूक्षेत्र, योजना व लोकराज्य ही मासिके देखील अभ्यासिकेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या ठिकाणी महिला बचत गटमार्फत कॅन्टीन चालवण्याबाबत चाचपणी करण्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा ग्रंथपाल राजेश कोरे तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.