यवतमाळ बाजार समितीच्या शिवसेने संचालकाचा गोळ्या झाडून निर्घृण खून….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिवसेनेचे संचालक सुनील डिवरे यांची आज (ता. ३ फेब्रुवारी) गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे.
या घटनेनंतर शिवसैनिकांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली असून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना नेत्याच्या खुनामुळे जिल्ह्यात एकच खळबड उडाली आहे.
ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील भांब राजा गावात आज घडली आहे. भांब राजा गावात २ ते ३ अज्ञात तरुणांनी सुनील डिवरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले आहेत. ही बातमी यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात शिवसैनिकांनी एकच गर्दी केली आहे.
या घटनेनंतर संतप्त जमावाकडून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांनी जादा कुमक मागवून जमावाला वेळीच नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सुनील डिवरे भांब राजा या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होते. यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिवसेनेचे मोठे नेते म्हणून सुनील डिवरे यांची ओळख होती. यवतमाळ जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक लढवण्यासाठी डिवरे हे इच्छूक होते. त्याअगोदरच त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….