लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना संसदेत फटकारले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेत असताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका गोष्टीबद्दल खडसावले. राहुल गांधींच्या वतीने संसदीय कार्यपद्धती योग्य न पाळल्याने ओम बिर्ला चर्चेदरम्यान संतापले.
ही परवानगी देणारे तुम्ही कोण…? :-ओम बिर्ला…
वास्तविक राहुल गांधींनी भाजप खासदार कमलेश पासवान यांना चर्चेदरम्यान बोलू दिले. यामुळे संतप्त होऊन सभापती ओम बिर्ला म्हणाले, “ही परवानगी देणारे तुम्ही कोण? तुम्ही परवानगी देऊ शकत नाही, हा माझा अधिकार आहे. तुम्हाला कोणालाही परवानगी देण्याचा अधिकार नाही.”
भाजप खासदाराचा राहुल गांधींशी वाद
काल संसदेत राहुल गांधींचा भाजप खासदार कमलेश पासवान यांच्याशी जोरदार वाद झाला होता. पासवान हे चुकीच्या पक्षात आहेत आणि तिथे तुमच्या बलिदानाची कोणालाच पर्वा नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. यावर पासवान म्हणाले, मी दलित समाजातून आलो असून भाजपने मला तीनदा सभागृहात पाठवले आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष केले. माझ्यासाठी यापेक्षा मोठे पद कोणते असू शकते.” कमलेश पासवान यांनी असेही म्हटले की, त्यांच्या पक्षाकडे (काँग्रेस) मला घेण्याइतकी स्थिती नाही.
त्याचवेळी, आज एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना कमलेश पासवान म्हणाले की, “राहुल गांधीजी मला प्रलोभने देत आहेत, पण आधी त्यांनी पक्ष सांभाळावा आणि स्वत:कडे बघावे.”

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..