केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवाब मलिकांविरोधात सात दिवसांमध्ये गुन्हा नोंदविण्याचे आदेश ; समीर वानखेड़ेनी केलेली तक्रार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : मुंबई विभागीय अंमली पदार्थ विरोधी विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात सात दिवसांत गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यापूर्वी सुनावणीकरीता मुंबई पोलीसांना आयोगाने समन्स बजावला होता.
त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रविण पडवळ हजर राहिले होते. त्यावेळी गुन्हा दाखल करून चौकशीचा अहवाल आयोगाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वानखेडेंच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नये
या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचलाक आणि मुंबई पोलीसांना आयोगाने नोटीस जारी केली होती. आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्या समोर समीर वानखेडे देखील हजर राहिले होते, त्यानंतर त्यानी सदर आदेश दिले.
राज्य सरकारने या प्रकरणात तपास पूर्ण करून आयोगाला अहवाल सादर करावा तोपर्यंत वानखेडे यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश दिला आहे. नबाब मलिक यांनी वानखेडे आणि कुटूंबियांवर खोट्या जात प्रमाणपत्रा संबंधी आरोप करत तक्रार दाखल केली असून त्यावर जात पडताळणी समिती समोर सुनावणी सुरू आहे. या विरोधात आपल्यावर राजकिय हेतूने खोटे आरोप करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असून दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल केली होती.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….