लता मंगेशकर कोरोनामुक्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गानकोकिळा लता मंगेशकर यांची तब्येत आता सुधारत असून त्या आता कोरोनातून मुक्त झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सध्या लतादिदी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात अतीदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
लतादिदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येत आहे. आता त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे. न्युमोनिया आणि कोरोनातून त्या आता बऱ्या झाल्या आहेत. आता त्या थोड बोलूही शकतात.
यासंदर्भात काल ( शनिवारी ) ब्रीच कॅंडी रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमनेही लतादिदींची तब्येत हळूहळू सुधारत असल्याची माहिती दिली होती.