राहुल गांधीच्या विरोधात याचिकेची ५ फेब्रूवारीला भिवंडीतील जलद कोर्टात होणार सुनावणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सन २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान तालुक्यातील सोनाळे गावात झालेल्या जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आरएसएसच्या पदाधिकाऱ्याने भिवंडी कोर्टात अवमान याचिका दाखल केली होती.
या प्रलंबित दाव्याची सुनावणी येत्या ५ फेब्रुवारी पासून नियमित केली जाणार असल्याचे आरु असताना देश न्यायाधीश जे. व्ही.पालीवाल यांनी दिले आहेत. महानगरपालिका निवडणुकीची तयारी शहरात सुरु असताना भिवंडीत राहुल गांधीची भिवंडी कोर्टातील उपस्थिती निवडणुकीवर परिणाम करणारी ठरणार आहे.
गेल्या सात वर्षांपासून हा दावा भिवंडी कोर्टात सुरु आहे. शनिवारी रोजी सुनावणी सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाच्या एका दाव्याचा हवाला देत, निवडून आलेल्या प्रतिनिधींशी संबंधित खटले जलद गतीने चालवायचे आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर आधारित राहुल गांधींवरील दावाही त्याच श्रेणीत येत असल्याने हा दावा वर्गीकृत केल्याचे नमूद केले. त्यामुळे हा दावा प्राधान्याने आणि जलदगतीने चालवावा आणि दैनंदिन सुनावणी व्हावी, अशी इच्छा होती. यावर न्यायधीशांनी दोन्ही वकिलांची तयारी विचारली असता तक्रारदारातर्फे वकील प्रबोध जयवंत तर राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर, यांनी फास्ट ट्रॅकिंग आणि दैनंदिन सुनावणीसाठी तयारी दाखवली आहे.
काय आहे प्रकरण?
भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या 2014 साली लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत राहूल गांधी यांनी महात्मा गांधींजींची हत्या आरएसएसनेच घडवून आणली, असे खळबळजनक वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेविरोधात राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून सदरच्या याचिकेची सुनावणी दिल्ली न्यायालयात करण्याची विनंती केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रासोबत भाषणातील उतारा दाखल केला होता. तो उतारा भिवंडी कोर्टात पुरावा म्हणून दाखल करून घ्यावा, असा अर्ज याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयाकडे केला होता. परंतू मागील 12 जून 2018 रोजी भिवंडी न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी राहूल गांधी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. तसेच राहुल गांधी यांच्या वकीलांनी ही याचिका समन्स ट्रायलप्रमाणे चालविण्याची मागणी केली होती. तसेच उच्च न्यायालयातील कागदपत्रे भिवंडी न्यायालयांत दाखल करून घेण्यास न्यायालयास विरोध दर्शविला होता. त्यावेळी ही याचिका समन्स ट्रायलप्रमाणे चालविणयास न्यायालयाने मान्यता दिली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात दावा दाखल केला होता. कुंटे यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी आरएसएसच्या संदर्भात केलेले भाषण प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह होते. तर राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आजच्या आदेशानंतर या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार आहे. 2017 पासून हा दावा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात जात आहेत. मात्र जलदगती न्यायालयात सुनावणी होईल, असे ते म्हणाले.
या याचिकेनंतर कोर्टात उपस्थित राहण्यासाठी खासदार राहुल गांधी वारंवार भिवंडीत आले होते. काही वेळा त्यांनी जाहीर भाषण देत कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याने मागील महानगर पालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होऊन शहरातील काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले होते. आता पुन्हा निवडणुकीची तयारी शहरात सुरु असताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची हजेरी निवडणुकीवर परिणाम करणारी ठरणार आहे.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…