राज्यात गुरुवारी 25 हजार 425 कोरोनाबांधिताची नोंद तर 42 जणांचा मृत्यु…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 25 हजार 425 नव्या रुग्णांची भर पडली असून 42 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 36 हजार 708 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 72 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 72 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 2930 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1592 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 42 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 42 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 71 लाख 97 हजार 001 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे. सध्या राज्यात 15 लाख 31 हजार 108 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3259 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 40 लाख 12 हजार 958 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गुरुवारी 1 हजार 384 नवे कोरोनाबाधित
मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 384 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत रुग्णसंख्या काही प्रमाणात आणखी कमी झाली आहे. मुंबईत सद्यस्थितीला 18 हजार 40 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गुरुवारी 1 हजार 384 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 581 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 5 हजार 686 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….