MPSC गट ब मुख्य परीक्षा लांबणीवर ; म्हाडाच्या वेळापत्रकात मोठा बदल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केल्याने ही परीक्षा लांबणीवर टाकली जात असल्याचे ट्विट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलं आहे.
5 आणि 12 फेब्रुवारीला ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आयोगावर आली आहे.
कोरोना काळात आयोगाकडून घेण्यात येणार्या अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. याचा प्रचंड मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय.

तसेच महाडा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.
7 फेब्रुवारीला सुरू होणारी परीक्षा आता 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा 31 जानेवारी, 2, 3 , 7, 8, 9 फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे TCS या कंपनीकडे या परीक्षेचं नियोजन देण्यात आलं आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….