आधुनिक मोजणीयंत्राद्वारे नागरिकांचे कामे जलदगतीने करा :- पालकमंत्री ; भूमि अभिलेख विभागास अत्याधुनिक मोजणी साहित्याचे वाटप…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 27 जानेवारी :- भूमि अभिलेख विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेले अत्याधुनिक मोजणी यंत्र सॅटेलाईटशी कनेक्ट होऊन अचूक अक्षांश व रेखांश दर्शविते त्यामुळे जमीन मोजमापमध्ये अचुकपणा व पारदर्शीपणा येतो. याचा लाभ सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना होणार असुन भूमि अभिलेख विभागाने या मोजणीयंत्राचा उपयोग नागरिकांची कामे जलदगतीने पुर्ण करण्यासाठी करावा, असा आशावाद पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला.

जिल्हा खनिज प्रतिष्ठाण यवतमाळ यांचे निधीतुन यवतमाळ जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयासाठी अत्याधुनिक मोजणी साहित्य खरेदी साठी निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधीमधुन खरेदी करण्यात आलेल्या रोव्हर, संगणक, ईटीएस मशीन, प्लॉटर मशीन ई अत्याधुनिक मोजणीयंत्राचे वाटप व लोकार्पण काल पालकमंत्री सांदिपान भुमरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार वजाहत मिर्झा, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकारसिंह भोंड, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवदास गुंड यांचे उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन अंजू बोपचे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपअधीक्षक बळवंत मस्के यांनी व्यक्त केले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….