वर्ध्यात कारचा भीषण अपघात ; 7 विद्यार्थ्यांच्या जागीच मृत्यू ; मृतांमध्ये भाजप आमदारांच्या एकुलत्या एक मुलाचा ही समावेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वर्धा : वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवक जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचीही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील तीन मुलांबरोबरच एका आमदार पुत्रही यात मृत्यू झाला आहे.
वर्ध्यामधील सेलसुरामध्ये रात्री दीड वाजता झायलो कारचा भीषण अपघात घडला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार नदीच्या पुलावरून खाली कोसळली. अपघातात दत्ता मेघे वैद्यकीय रूग्णालयातील सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार विजय राहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा अविष्कार राहांगडालेचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. त्यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्यानं वर्ध्याकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये रात्रीस आणण्यात आले आहेत. सातही विद्यार्थी दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….