उत्तर प्रदेशात “आप” पक्षाचे उमेदवारांचा आत्महत्या करण्याच्या प्रयत्न…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुझफ्फरनगर – उत्तरप्रदेशातील आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार जोगिंदर सिंग यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला.
त्यामुळे नाराज झालेल्या सिंग यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी सिंग यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या सिंग यांना आपने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मीरापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र, अर्जात काही त्रुटी असल्याने तो फेटाळण्यात आला.
त्यामुळे निराश झालेल्या सिंग यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे तो अयशस्वी ठरला. त्यानंतर सिंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. अर्जातील चूक दुरूस्त करण्याची संधी देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…