मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “फिट अँड फाइन” ; ऑपरेशन नंतर प्रथमच आला समोर फोटो ; बाळासाहेब व नेताजींना केले अभिवादन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले.
गेल्या काही दिवसांपूर्वी मानदुखीचा त्रास झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे गेले काही दिवस ते घरीच आराम करत होते. दरम्यान, या आजारपणातून बरे झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच उद्धव ठाकरे अशा पद्धतीने फोटोच्या माध्यमातून समोर आले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते झोपून आहेत, कशाचा तरी आधार घेऊनच त्यांना चालावे लागते, अशा काही वावड्या राजकीय वर्तुळात उठवल्या जात होत्या. मात्र, अशा वावड्यांना उद्धव ठाकरेंच्या आजच्या फोटोमुळे पूर्णविराम मिळाला आहे. तसेच, उद्धव ठाकरे ‘फिट अँड फाईन’ असल्याचे दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत साधणार संवाद!
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत आज संवाद साधणार आहेत. हा संवाद ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल, अशी माहिती आहे. मात्र आता बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र देणार आणि काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….