मुंबईतील आग घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाख रुपयांची भरपाई….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : मुंबईतील ताडदेव भागात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून येथील एका इमारतीत अग्नी तांडव बघायला मिळाला आहे. ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आज(२२ जाने.)सकाळी भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
तसेच या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत, तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’ताडदेव येथील कमला इमारतीस लागलेली आग दुर्दैवी असून येथे बचावकार्य वेगाने सुरू आहे. तेथील नेमकी परिस्थिती, मदतकार्य याबाबत माहिती घेण्यासाठी या ठिकाणाला भेट दिली. तसेच रहिवाशांशी बोलून त्यांना या कठीण प्रसंगी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.’ तसेच या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सरकार ५ लाख रुपयांची भरपाई देईल. जखमींवर उपचार करण्यास २ रुग्णालयांनी नकार दिल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र दोन्ही रुग्णालयांनी, जखमींना दाखल करून उपचार केल्याचे, मला कळवले आहे, असेही आदित्य यांनी सांगितले.

दरम्यान, ही आग नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला लागली असून या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत, तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे . तसेच अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत, तर बाकी जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु असल्याचे बघायला मिळत असून ही आग कशी लागली यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….