उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद साधणार ; आगामी निवडणुका संदर्भात काय कानमंत्र देतात…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 22 जानेवारी :- राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत.
उद्या ऑनलाईन माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. उद्या 23 जानेवारी म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिकांना काय आदेश देणार? येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय आदेश देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरीच आहेत आणि घरुनच आपली शासकीय कामे पूर्ण करत आहेत. मात्र, असे असताना विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीका आणि आरोप यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेतात का हे पहावं लागेल.
आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांना कानमंत्र येत्या काळात मुंबईसह राज्यातील इतरही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्याही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या संदर्भात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करुन काय कानमंत्र देतात हे पहावं लागेल. आता उद्धव ठाकरे यांच्या या ऑनलाईन संवादाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने शिवसैनिक हे मुंबईत दाखल होत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोविड संकटामुळे शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करणं शिवसैनिकांना शक्य होत नाहीये. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करुन मार्गदर्शन करणार आहेत.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….