नारी शक्ती पुरस्काराकरिता प्रस्ताव आमंत्रित…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- केंद्रशासनाचे महिला व बाल विकास विभागाद्वारे समाजात महिला सशक्तीकरण, समाज व राष्ट्र निर्माण करण्याचे कामात उत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती तसेच संस्था यांना दरवर्षी नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देण्यात योणार आहे. सदर पुस्काराकरिता www.awards.gov.in या संकेतस्थळावर 31 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज/आवेदन मागविण्यात येत आहे.
पुरस्काराचे स्वरुप रुपये दोन लक्ष व प्रशस्तीपत्र असे असून यासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. नारी शक्ती पुरस्काराकरिता वैयक्तीक अर्ज करणाऱ्यांचे वय दि. 01 जुलै 2021 रोजी 25 वर्षे पुर्ण केलेले असावे, नारी शक्ती पुरस्कार करिता संस्था आवेदन करीत असले तर त्यास सामाजिक कार्याचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असावा. अर्जदारास यापुर्वी मंत्रालयाने दिलेल्या स्त्री शक्ती पुरस्कारासह पुर्वीचा समान पुरस्कार प्राप्त असू नये. उत्कृष्ट कार्यासाठी नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला जाऊ शकतो, शक्यतो व्यक्ती/गट/संस्था/स्वयंसेवी संस्था इत्यादी यांना महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या किंवा या बाबीशी संबंधित किंवा अनुषंगिक बाबीमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये उत्कृष्ट कामगीरी केलेली असावी. निर्णय क्षमता, कौशल्य विकास, ग्रामिण भागातील महिलांना सोयी सवलती उपलब्ध करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, कल व संस्कृती, खेळ, महिला सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, जिवन कौशल्य इ. बाबतीत महिला सक्षमीकरण करण्यासाठी केलेले योगदान याबाबतचा अनुभव असावा.
राज्य अथवा केंद्रशासीत प्रदेशात बाल लैगिंक गुणोत्तर अचुकपणे सुधारण करण्याचे काम करणाऱ्यांचा या पुरस्कारासाठी प्रथम प्राधान्याने विचार करण्यात येईल. साधारणपणे पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार नाहीत मात्र अपवादात्मक प्रकरणात प्रस्ताव सादर केल्यानंतर मृत्यू झाला असल्यास मार्गदर्शक तत्वांमध्ये नमुद केल्याप्रमाणे पुरस्कार दिले जातील, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योति कडू यांनी कळविले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….