ठरलं ; आता महानगर पालिका निवडणूकचा बिगुल वाजणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे : आगामी महापालिका निवडणूकांची प्रभाग रचना अद्याप अंतिम झालेली नसली तरी, या निवडणूकांचे बिगूल वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून 2022 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांसाठी कोवीड योग्य वर्तन नियमावली जाहीर केली आहे.
त्यात, निवडणूकांसाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ति पासून ते निवडणूक निकाला पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर घ्यावयाच्या उपाय योजना तसेच नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे, राज्यातील महापालिकांच्या निवडणूकांची प्रक्रीया लांबली असली तरी या निवडणूकांचा कार्यक्रम पुढील काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता या नियमावालीमुळे बळावली आहे. त्यामुळे निवडणूकांच्या तारखांकडे डोळे लावून बसलेल्या इच्छूकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.
राज्यातील प्रमुख दहा महापालिकांसह, मागील वर्षी मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूकां या 2022 च्या मार्च महिन्यात होणे अपेक्षित होते. त्यासाठी आयोगाकडून निवडणूकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर, शासनाने ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्याने प्रभाग रचना लांबणीवर पडली तर हा अध्यादेश न्यायलयाने रद्द केल्याने या निवडणूकाच अडचणीत आल्या होत्या.
त्यानंतरही आयोगाकडून प्रभाग रचना सादर करण्यासाठी राज्यातील महापालिकांना जानेवारीच्या पहिल्या आठवडयात मुदत दिली होती. मात्र, या कालावधीत आयोगातील कर्मचारी आणि अधिकारीच करोना बाधित झाल्याने हे सादरीकरण रखडले होते. त्यानंतर महापालिकांना कोणत्याही पुढील सूचना आलेल्या नाहीत. त्याततच आता आयोगाने आधी ही करोना नियमावली जाहीर केली असल्याने लवकरच हा निवडणूकांच्या कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….