गेल्या 24 तासात 200 पॉझिटिव्ह 56 कोरोनामुक्त ; एक मृत्यू ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1717 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 904
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 19 जानेवारी : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 200 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 56 जण कोरोनामुक्त झाले असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 881 व बाहेर जिल्ह्यात 23 अशी एकूण 904 झाली असून त्यातील 41 रूग्ण रूग्णालयात तर 863 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1252 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 200 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1052 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 74223 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71530 आहे. आज मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 45 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1789 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 200 रूग्णांमध्ये 66 महिला व 134 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात 16, बाभुळगाव सहा, दारव्हा एक, दिग्रस चार, घाटंजी 11, कळंब 13, महागाव एक, मारेगाव दोन, नेर 39, पांढरकवडा 29, पुसद पाच, राळेगाव 11, उमरखेड दोन, वणी नऊ, यवतमाळ 40, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील 10 रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लक्ष चार हजार 837 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 30 हजार 424 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.22 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 15.97 आहे तर मृत्यूदर 2.41 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1717 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 52 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1717 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 50 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 737 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड उपयोगात असून 753 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….