राज्यात शाळा 4 ते 5 दिवसात सुरु होणार…? ; शिक्षणमंत्र्यांच्या प्रस्ताव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव वाढल्यापासून राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 31 जानेवारीपर्यंत बंद असणाऱ्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार असल्याचं जाहीर झालं.
मात्र आता लाट ओसरत असल्याची आकडेवारी मागील ३ दिवसांपासून समोर येत असल्याने पुन्हा शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. याआधी शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू व्हाव्या असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं होतं.
कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यातील शाळांना पुन्हा टाळं लागलं. पण लवकरच शाळा सुरू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली असून येत्या ४-५ दिवसांत यावर निर्णय येणं अपेक्षित आहे. त्यामुळे जानेवारी महिना संपण्याच्या आधीच राज्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजणार असल्याची शक्यता आहे.
या प्रस्तावात गाव आणि जिल्हा पातळीवरील शाळांचा निर्णय घ्यावा, हे अंतर्भूत करण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाने अंमलबजावणीचा निर्णय घ्यावा. मात्र राज्य शासनाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा, आणि प्रभाव कमी असणाऱ्या ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्यात याव्या, असं ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….