ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन.डी पाटील यांचे निधन ; उद्या होणार अंतसंस्कार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- महाराष्ट्राचे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती कारणाने त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
दरम्यान, आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या वर्षी त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपला, अशी भावना सर्वच स्तरातून उमटत आहे.
दरम्यान उद्या एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी कोल्हापुरातील शाहू कॉलेज सदर बाजार येथे उद्या मंगळवार (ता. 18) रोजी पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना नियमांचे पालन करत अंत्यदर्शनासाठी येण्याचे आवाहन केले आले आहे. अंत्यदर्शनासाठी येताना सोशल डिस्टंसिंग आणि तोंडावरती मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे कैवारी, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. कोल्हापुरातील राजकीय नेत्यांनी सोशन मिडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..