नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल मार्च पर्यंत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडोर प्रकल्प साकार होण्याच्या दिशेने वेगाने पावले पडताना दिसत आहेत.
त्याअनुषंगाने हवाईसह सर्व आवश्यक सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. आता या सर्वेक्षणातून प्राप्त आकडेवारीचे विश्लेषण करून विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे.
मार्चपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडे हा डीपीआर सोपवला जाण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडूनही मंजुरी घ्यावी लागणार आहे. मंजुरी प्राप्त होताच अहमदाबाद-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडोरच्या धर्तीवर नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉर प्रकल्प हा २०१९ मध्ये प्रस्तावित सहा नव्या बुलेट कॉरिडोरपैकी एक आहे. या प्रकल्पासाठी नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेडकडून डीपीआर बनविण्याच्या दृष्टीने रेल लाइनची अंतिम अलॉटमेंट डिझाइन व प्रायमरी रूट मॅप बनविण्यासाठी आकाशी सर्वेक्षण (लिडार/एरिअल सर्व्हे) करण्यात आले. यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये निविदा जारी करण्यात येऊन सिकॉन व हेलिका ज्वाॅइंट व्हेंचर कंपनीला एरिअल सर्व्हेचे काम देण्यात आले. १२ मार्च २०२१ला सुरू झालेले हे काम जुलै २०२१ मध्ये पूर्ण झाले. यात हेलिकॉप्टरवर अत्याधुनिक लीड व इमेजनरी सेंसर लावण्यात येऊन मुुंबई ते नागपूरपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. हवाई सर्वेक्षणानंतर रायडरशिप सर्व्हे, एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट व सोशल इम्पॅक्ट सर्व्हे करण्यात आले. त्यावरून डीपीआर तयार केला जाईल.
नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी सर्व प्रकारच्या सर्वेक्षणाचे काम आटोपले आहे. आता या सर्वेक्षणातून प्राप्त अहवालाचे विश्लेषण केले जाऊन डीपीआर तयार केला जात आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन मार्चपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडे डीपीआर सोपवला जाण्याची शक्यता आहे.
– सुषमा गौर, जनसंपर्क अधिकारी, नॅशनल हायस्पीड रेल कार्पो. लि.
वेग ३५० किमी प्रति तास
नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प ७४१ किलोमीटर क्षेत्रावर प्रस्तावित आहे.
या क्षेत्रात नागपूर, खापरी डेपो, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव, जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, ईगतपुरी व शाहपूर ही प्रस्तावित थांबे असणार आहेत.
या कॉरिडॉरमध्ये ३५० किमी प्रति तास वेगाने बुलेट ट्रेन धावेल. ट्रेनमध्ये एकावेळी ७५० प्रवासी बसू शकतील.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….