यूपीसह 5 राज्यांमध्ये निवडणूक रैली , रोड शो वरील बंदी वाढवली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील राजकीय रॅली आणि रोड शो वरील बंदी 22 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल आहे.
याआधी निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून 15 जानेवारीपर्यंत रॅली आणि रोड शोवर बंदी घातली होती.

मात्र, छोट्या आणि इनडोअर सभांबाबत निवडणूक आयोगाकडून दिलासा देण्यात आला आहे. या रॅलींमध्ये 300 किंवा उपस्थित जागेच्या 50 टक्क्यांपर्यंत सभा घेण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना सूचना दिल्या आहेत की, या बैठकीदरम्यान कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच 8 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आलेल्या निवडणुकांबाबत सर्वसमावेशक 16 कलमी मार्गदर्शक तत्त्वेही पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या घोषणेच्या वेळी निवडणूक आयोगाकडून 15 जानेवारीपूर्वी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, परिस्थिती सुधारल्यास त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते. आता याबाबत आयोगाने आदेश जारी केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….