नितेश राणे यांना दिलासा कायम ; पूर्ण सुनावणी होत नाही तो पर्यंत अटक नाही….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.
त्यामुळे नितेश राणेंना दिलासा मिळाला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्यावर आहे.
नितेश राणे यांच्यासह अन्य आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज नितेश राणेंच्या वतीने ज्येष्ठ वकील नितीन प्रधान यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. करोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता हायकोर्टाचे कामकाज सध्या दुपारी 12 ते 3 या वेळेत सुरू असल्याने वेळेअभावी ही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. यावरील पुढील सुनावणी गुरूवारी दुपारी 1 वाजता न्यायमूर्ती सी.वी. भडंग यांच्यापुढे पुन्हा होणार आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणूक रणघुमाळीत शिवसेनेचे कार्यकर्ते संतोश परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणेच आहेत असा दावा करत राज्य सरकारने या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयात विरोध केलेला आहे. ही घटना 8 नोव्हेंबर 2021 रोजी घडली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..