पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : देशभरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ काँन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
ओमायक्रॉनची धास्ती, लसीकरण मोहीम आणि करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या या आढावा बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ आहे. यासाठी राज्य सरकारकडून निर्बंधांसह अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांचा आणि एकंदरीतच देशातील परिस्थतीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये देशभरातील ३० मुख्यमंत्री सामील होणार असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सामील होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने मागील आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र, या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठक बुधवारी दुपारी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही आँनलाइन बैठक होणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..