राज्यात मंगळवारी 34,424 रुगणांची नोंद तर 22 जणाचा मृत्यु….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात आज तब्बल 34 हजार 424 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 18 हजार 967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे.
राज्यात 34 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 34 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1281 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 499 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात ओमायक्रॉन ७८२ रुग्ण आहे
मागील काही दिवसातील रूग्ण संख्या
10 जानेवारी – 29,671 रूग्ण
9 जानेवारी – 44, 388 रूग्ण
8 जानेवारी – 41, 134 रूग्ण
7 जानेवारी – 40, 925 रूग्ण
6 जानेवारी – 36,265 रूग्ण
5 जानेवारी – 26, 538 रूग्ण
राज्यात आज 22 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.02 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 21 हजार 477 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 66 लाख 21 हजार 070 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.75 टक्के आहे. सध्या राज्यात 14 लाख 64 हजार 987 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3032 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7, 09 , 28, 954 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत नवे 11 हजार 647 कोरोनाबाधित
मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत 11 हजार 647 नवे कोरोनाबाधित समोर आले असून दोन जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी तब्बल 14 हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर कायम राहिला असून मागील 24 तासांत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 413 झाली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..